लातूर: मेडिकल दुकान फोडले , 3 लाखांची रोकड लंपास

 


राजकुमार जाेंधळे, लातूर: शहरातील डालडा फॅक्टरी परिसरात असलेल्या मेडिकल दुकानाच्या शटरचे कुलूप ताेडून चाेरट्यांनी आत ठेवण्यात आलेली तीन लाखांची राेकड पळविल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात रविवारी अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी उद्धव शंकरराव बाेळंगे (वय ४३ रा. शाहू चाैक, लातूर) यांचे डालडा फॅक्टरी परिसरात मेडिकल दुकान आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या मेडिकलला कुलूप लावून रात्री घराकडे गेले हाेते. दरम्यान, मेडिकल दुकानाच्या शेटरचे कुलूप ताेडून चाेरट्यांनी दुकानामध्ये प्रवेश केला. दुकानात असलेल्या ड्रावरचे लाॅक ताेडून आत ठेवलेली तीन लाखांची राेकड चाेरट्यांनी लंपास केली. ही घटना फिर्यादीला सकाळी समजली. याची माहिती त्यांनी पाेलिसांना दिली. घटनास्थळी गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पाेलिस निरीक्षक प्रेम प्रकाश माकाेडे करीत आहेत


Post a Comment

0 Comments