जळगाव: अमळनेरला वीज कोसळून तरूणीचा मृत्यू

 


शेतमजुरीसाठी कामाला गेलेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना नगाव खुर्द येथे सायंकाळी घडली.

नगाव खुर्द येथे परराज्यातून शेतीच्या कामासाठी कुटुंबासह आलेली निरगली मुका पावरा (17) ही रविवार, दि. 19 मार्चला शेतात गेली होती. सायंकाळी ५ च्या सुमारास नगाव खुर्द परिसरात विजेच्या गडगडाटसह वादळाला सुरुवात झाल्याने तीन ते चार जणांसोबत निरगली ही नगाव खुर्द येथे घराकडे जायला निघाली. नगाव खुर्द शिवारातील गजानन उत्तम पाटील यांच्या शेताजवळील रस्त्यावर चालताना निरगली मागे राहिल्याने तिच्यावर जोरदार वीज कोसळली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments