"काय स्पीड हाय राव., देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा"; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

 Batmi 24 Tass Online : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणाऱ्या बंडखोर आमदारांनी ठाकरे आपण ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. सुप्रिम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमधून बंडखोर शिंदे गटाने हा दावा केला आहे.

आमच्याकडे दोन तृतियांश आमदारांचा पाठिंबा आहे. ३८ आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे हे सरकार अल्पमतात असल्याचा दावा बंडखोर शिंदे गटाने याचिकेत म्हटले आहे. याच दरम्यान या सर्व राजकीय घ़डामोडींवर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

किरण माने हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून विविध मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करत असतात. आताही त्यांची एक फेसबुक पोस्ट जोरदार व्हायरल होत असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. "काय स्पीड हाय राव.आपण उगीच कोर्टाच्या वेळखाऊ कामकाजाला शिव्या देतो. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा. आज संध्याकाळी ६.३०ला एकनाथ शिंदेंची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. रविवार असून संध्याकाळी ७.३० वाजता रजिस्ट्रीनं याचिका स्वीकारली आणि उद्या २७ला सुनावणी ठरवलीसुद्धा.निकालच लावून टाकायचा ना थेट.जय सुप्रीम कोर्ट" असं किरण माने यांनी म्हटलं आहे.


शिवसेनेकडून बंडखोरांवरील कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आलेली तक्रार, अपात्रतेसाठी १६ आमदारांना आलेल्या नोटिसा याविरोधात शिंदे गटाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या याचिकेमध्ये शिंदे गटाने आपल्याला शिवसेनेच्या ३८ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेच्या ३९ आणि इतर १२ अशा ५१ आमदारांचा पाठिंबा आहे.


दरम्यान, संजय राऊत यांच्याकडून आपल्याला बोलावले जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्याकडून धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तसेच शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेल्या प्रक्षोभक भाषणाची माहिती आणि लिंक्स सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments