घरासमोर कपडे धूवत असताना महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार, माकडाने आधी हात पकडला अन्...

 


 
घरासमोर कपडे धुवत असताना एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील निवळी येथून ही घटना समोर आली आहे. जखमी महिलेवर पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

प्रभावती शिवाजीराव लिपने (वय 50) असं महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला घराबाहेर कपडे धुवत असताना अचानक वानर आले आणि त्याने महिलेच्या हाताला पकडून दंडाला चावा घेतल्याची घटना घडली. यात महिला जखमी झाली आहे. जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

पाथरी तालुक्यातील निवडी येथील प्रभावती लिपणे या आपल्या घरासमोर कपडे धुवत होत्या. याचवेळी त्या ठिकाणी एक वानर आले. आणि वानराने प्रभावती लिपने यांच्यावर हल्ला केला. यावेळी वानराने दंडाला कडकडून चावा घेत गंभीर जखमी केले.

या वेळी प्रभावती यांनी आरडा ओरड केल्याने ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने धावले. त्यामुळे प्रभावती लिपने यांची या वानराच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्या आहेत. जखमी प्रभावती लिपने यांना तातडीने पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथील शासकीय रुग्नालयात पाठवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments