" तुम्ही शिंदेंना सोडा , मी सगळी शिवसेना ... " ; ठाकरेंची फडणवीसांना ऑफर ?

 


मुंबई : "तुम्ही शिंदेना सोडा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्यासोबत येतो." अशी ऑफर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शपथविधीआधी फडणवीसांना (Devendra Fadnavis) दिल्याची खात्रीलायक माहिती 'साम'च्या सूत्रांनी दिली आहे.

त्यानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे. साम वृत्तवाहिनीने यासंदर्भात माहिती दिली आहे.

(Uddhav Thackeray And Devendra Fadnavis)

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करत ही ऑफर दिली होती अशी माहिती समोर येत आहे. नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधी उद्धव ठाकरे यांनी फडवीसांना फोन केला होता आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा, शिंदे यांना बाजूला ठेवा, मी सगळी शिवसेना घेऊन तुमच्याकडे येतो असं उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले होते अशी माहिती 'साम'ने दिली आहे.

उद्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर अशी माहिती समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या माहितीवर शिवसेनेकडून अजून अधिकृत स्पष्टीकरण आलं नसून शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. बंड केलेल आमदार परत शिवेसनेकडे येणार नाहीत अशी चिन्हे दिसायला लागल्यावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शपथविधीआधी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून "मी बाळासाहेबांचा पुत्र सगळी शिवसेना तुमच्यासोबत घेऊन यायला तयार आहे, तुम्ही शिंदे यांना बाजूला ठेवा." असं सांगितलं होतं. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाकडून "आता ही वेळ निघून गेलेली आहे, उशीर झालेला आहे." असं उद्धव ठाकरेंना सांगण्यात आलं होतं. अशी माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचं 'सकाळ'च्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांनी सांगितलं.

यासंदर्भात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, "यासंदर्भात आम्हाला माहिती नाही. त्यामुळे आम्ही त्याचावर बोलू शकत नाही, आणि आम्हाला याविषयी कुणी माहितीही दिलेली नाही." असं शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले म्हणाले आहेत.

सोर्स : सकाळ

Post a Comment

0 Comments