टीचर साडीत तुम्ही खूप छान दिसतात, तुम्ही माझ्या फेव्हरेट आहात, असं म्हणणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत हा लहान मुलगा शिक्षिकेला जे बोलतोय ते ऐकून तुमची बोलती बंद होईल.
लहान मुलं फारच गोड असतात. त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंद देणारी असते. सोशल मीडियावर लहान मुलांचे असे क्युट व्हिडीओ कायम व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून आपल्यालाही छान वाटतं. असाच एक लहान मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. इंटरनेटवर या व्हिडिओची चर्चाच चर्चा आहे
हा व्हिडीओ एका शाळेत चित्रित झाला आहे. यामध्ये हा शाळेतील लहानगा आपल्या टिचरसोबत बोलताना पाहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये हा मुलगा जे बोलतोय ते एकूण तुम्हीही थक्क व्हाल.
हा लहान मुलगा टिचरसोबत बोलतोय. टीचर तुम्ही साडी घालून आलेला तर खूप छान दिसत होतात. यावर टीचर विचारते मी का छान दिसत होती? यावर हा लहान मुलगा जरासा विचार करतो आणि पुन्हा म्हणतो तुमची ती साडी खूप छान होती. यावर टीचर पुन्हा विचारते, रितू मॅम पण साडीत छान दिसत होत्या ना? यावर मुलगा म्हणतो, हो पण तुम्हीच माझ्या फेव्हरेट आहात.
टीचर आणि शाळेतील मुलाचं हे संभाषण लोकांना फारच आवडलं आहे. या व्हिडिओतील मुलाने देशभरातील नागरिकांचं मन जिंकलं आहे.
0 Comments