पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाईपर्यंतची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजुला बघतच असतो. दररोज जे काही अपघात होतात त्यातले २० टक्के अपघात तरी विनाकरण काहीतरी अतिधाडस (daring) केल्याने हाेतात. आता हेच बघा ना या एका तरुणीचंही असंच.(viral video)
सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. काही जणांना या पोरीची हिंमत आवडली आहे, तर काही जणांना अशी जिवावर उदार होऊन केली जाणारी हिंमत म्हणजे मुर्खपणा वाटतो आहे.
विदेशी माणूस पडला सांबारच्या प्रेमात, त्याने सांगितलेली सांबारची चटकदार रेसिपी झाली तुफान व्हायरल, पाहा व्हिडिओ...
beutefullearth या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओवर ज्या भाषेत लिहिलं आहे, त्यावरून तरी हा व्हिडिओ भारतातला असावा असं वाटत नाही. पण अशा पद्धतीने हिंमत करणाऱ्या लोकांची आपल्याकडे काही कमी नाही. शिवाय सध्या पावसाळा सुरु असल्याने आपल्याकडेही अनेक नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याकडे व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की एका नदीला पूर आला आहे. त्या नदीवर एक पुल आहे. पण नदीचं पाणी एवढं वाढलं आहे की ते त्या पुलावरून वाहत आहे.
पुराचं पाणी ओसरेल, याची वाट बघत पुलाच्या दोन्ही बाजुला लोक थांबलेले आहेत. पण तेवढ्यात दुचाकी चालवत एक तरुणी आली. तिच्या मागे आणखी एक जण बसलेली होती. आणि तिने चक्क त्या ओसंडून वाहणाऱ्या पुलावरून गाडी घातली आणि भन्नाटपणे ती पुल ओलांडून दुसऱ्या बाजूला निघूनही गेली. सुदैवाने तिला काही झालं नाही. पण नदीचं पाणी एवढं जास्त होतं की ही वेडी हिंमत कधीही तिच्या अंगलट येऊ शकली असती.
0 Comments