उधारी वसूल करण्यासाठी, माय लेकाची ही काय अवस्था केलेय

 


उल्हासनगर : माणुसकीला लाजवेल अशी धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये  घडली आहे. उधारी वसुल करण्यासाठी माय लेकावर तालिबानी पद्धतीने अत्याचार करण्यात आला आहे.

पैशांसाठी या माय लेकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात या दोघांना गंभीर दुखापत झाली आहे 

उल्हासनगर मधील भय्यासाहेब आंबेडकर नगर येथे ही घटना घडली आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उधारी चे पैसे देण्यास उशीर झाला म्हणून आई आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या नंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.

निखिल चाबुकस्वार आणि मीना चाबुकस्वार असं जखमी झालेल्या मुलगा आणि आईचे नाव आहे. निखिल याने त्याच परिसरात राहणारे गणेश कांबळे आणि आकाश गायकवाड यांच्याकडून उधारीवर तीन हजार रुपये घेतले होते. ते पैसे देण्यास उशीर झाला म्हणून निखिल याच्यावर चाकू आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. निखिलच्या मध्यस्थी गेलेल्या आईला देखील बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत निखिल आणि मीना हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान निखिल चे वडील आज भाजी पाला व्यवसाय करतात. त्याठिकाणी सुद्धा आरोपी यांनी दबाव आणून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर चाबुकस्वार कुटुंबीय दहशतीच्या वातावरणात जगत असून पोलिसांनी तात्काळ आरोपी आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे यांना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी निखिल आणि त्याच्या आईने केली आहे.


Post a Comment

0 Comments