मित्रासोबत लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार...

 


अहमदनगर : सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्रासोबत लग्न लावून देतो, असे सांगून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला. आरोपीस लोणावळ्यातून अटक करण्यात आली असून, मुलीची सुटका करण्यात आली आहे.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

विश्वनाथ चिमाजी गडदे (रा. राहुरी, ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने १७ वर्षीय पीडितेला मित्रासोबत लग्न लावून देतो त्याच्याकडून दहा हजार रुपये घेऊन दे, असे सांगून आरोपीने पळवून नेले होते. त्यानंतर तिला आळंदी, जेजुरी येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो तिला घेऊन लोणावळ्याला गेला असता पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात पोक्सो व भादंवि कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments