रिक्षा व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

 


याप्रकरणी गणेश ज्ञानेश्वर माळी (वय 30 रा.रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र दुचाकीवरून जात असताना आरोपी त्याचा रिक्षा वेगात मागून घेऊन आला व त्याने ओव्हर टेक केले.  यात रिक्षाचा फिर्यादीच्या दुचाकीला धक्का दिला. यात फिर्यादी व त्यांचा मित्र दुचाकीसह खाली पडले. रिक्षाचालक तेथे न थांबता निघून गेला. यामध्ये फिर्यादी व त्यांचा मित्र जखमी झाले आहेत. वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments