FDA चे सहाय्यक आयुक्त लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात

 


प्रकरणी अधिक माहिती अशी की, कंपनीमार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना मिळावा यासाठी एका 54 वर्षीय व्यक्तीने अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करून परवाना देण्यासाठी सहाय्यक आयुक्त असलेल्या देसाई यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली होती. पडताळणीअंती देसाई यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान देसाई याला रंगेहात पकडण्यासाठी लाचलुचपत विभागाने औंध येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात सापळा रचला. त्यानंतर लाच स्वीकारताना साहेब देसाई याला रंगेहात पकडले. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments