माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेलेल्या पतीला मेहूण्याकडून कोयत्याने मारहाण याप्रकरणी सचिन एकनाथ वाघमारे (वय 32 रा.दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.20) फिर्याद दिली असून नागनाथ शंकर कांबळे (वय 50) व राकेश नागनाथ कांबळे (वय 32) दोघे राहणार दापोडी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. पत्नीने स्वयंपाक कोला नाही म्हणून त्यांनी पत्नीला मारहाण केली. याच्या रागातून पत्नी माहेरी निघून गेली. माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला फिर्यादी त्यांच्या सासरी गेले. यावेळी आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली.

यावेळी शिवीगाळ का करता म्हणून फिर्यादींनी जाब विचारला असता आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण करत डोक्यात कोयता मारून जखमी केले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments