धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर व्यापाऱ्याचे 27 लाख लुटले

 


धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर व्यापा-याला फिल्मी स्टाईलने लुटले गेले.

लुटीत व्यापा-याचे सुमारे सत्तावीस लाख रुपये चाेरीस गेल्याची माहिती मिळत आहे.

साईनाथ मनोहर तायडे व त्यांचा कार चालक अनिल भुसारे हे रात्री औरंगाबाद येथून कारने धुळे - सोलापूर महामार्गावरून घरी देवळी येथे निघाले हाेते. या प्रवासात त्यांच्या वाहनासमाेर दाेघांनी एका लाल रंगाची दुचाकी आडवी लावली

त्यानंतर लाकडी दांड्याने कारमधील लाेकांना मारहाण केली. या कारमधील असलेली एक बॅग दाेघांनी हिसकावून नेली. या घटनेमुळे कारमधील लाेक घाबरले हाेते. प्राथमिक माहितीनूसार सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळ घडलेल्या या घटनेत बॅगेतील सत्तावीस लाख रुपये चाेरीस गेले आहेत.

Post a Comment

0 Comments