४९ गुप्ती , ३० कट्यार व ६ रामपुरी चाकू....

 


अमरावती : मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरील मोर्शी तालुक्यातील सालबर्डी येथे सध्या यात्रा भरली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येत भाविक येतात. याचदरम्यान यात्रेत पोलिसांनी तब्बल ४९ गुप्ती, ३० कट्यार व ६ रामपुरी चाकूंचा साठा जप्त केला.

याप्रकरणी ईश्वरसिंग बावरी (२०, रा. तळेगाव श्यामजीपंत, वर्धा) याला पोलिसांनी अटक केली.

ग्रामीण पोलिसांच्या स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाला यात्रेत मोठ्या प्रमाणात शस्त्र विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. बावरीकडे शस्त्र विकण्याची कोणतीही परवानगी नव्हती. त्याच्याकडे शस्त्राव्यतिरिक्त हातोडे, ऐरण इतर साहित्यही होते.

सालबर्डी येथे यात्रेत आरोपी ईश्वरसिंग बावरी हा अवैधरित्या घातक शस्त्रांची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी शहानिशा करून आरोपी विक्री करित असलेल्या जागेवर छापा टाकला. तपासणी दरम्यान पोलिसांना लोखंडी ३० कट्यार, ४९ गुप्ती, ६ रामपुरी चाकु, शस्त्र तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी हाथोडे, ऐरण व लोखंडी कोरणे आढळून आले. सर्व शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपी राजरोसपणे शस्त्राची विक्री यात्रेत करीत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, श्रीराम लांबाडे, पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे , मुलचंद भांबुरकर , पोलीस अमंलदार सुनील महात्मे, पुरूषोत्तम यादव, सैय्यद अजमत, उमेश वाकपांजर, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, अमोल केन्द्रे, निलेश खंडारे व चालक संदीप नेहारे यांनी केली.


Post a Comment

0 Comments