वाकळवाडीत ७५ किलो अफू जप्त....

 


वाकळवाडी तालुका खटाव येथील शेतात लावलेला तब्बल 75 किलो अफू वडूज पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. याबाबत वडूज पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर अफूची शेती केल्याप्रकरणी अमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, वाकळवाडी तालुका खटाव येथील शिवारात सुमारे एक एकर मध्ये आफुची लागवड केली असल्याची माहिती वडूज पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी संबंधित ठिकाणावर पोलिसांनी छापा टाकला. या दरम्यान वाकळवाडी शिवारात शांताराम रामचंद्र मोप्रेकर, चंद्रप्रभा शिवाजी मोप्रेकर सर्व राहणार वाकळवाडी यांनी त्यांच्या शेताच्या मधोमध गहू, हरभरा, कांदा पिकाच्या आडोशाला राज्यात बंदी असलेले मानवी शरीरास अपायकारक असणारे गुंगीकारक अफुची लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना केल्याचे दिसून आले.

या छाप्यात सुमारे एक लाख 52 हजार 700 रूपयांचा माल वडूज पोलिसांना आढळून आला. औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम कलमानुसार वडूज पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमध्ये दादा देवकुळे, संदीप शेडगे, दर्याबा नरळे, दीपक देवकर, प्रशांत हांगेसागर बडदे, वृषाली काटकर मेघा जगताप यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर यांनी दिली असून, अधिक तपास मालोजीराव देशमुख करत आहेत.

Post a Comment

0 Comments