प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला

 


नाशिक: सतत भांडणाच्या कारणावरून प्रियकराने त्याची प्रेयसी व तिच्या पहिल्या पतीच्या मुलीवर उपनगर परिसरातील केंद्रीय शाळेसमोर भरदिवसा चाकूने हल्ला केला, तर प्रियकराने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तिघांवर बिटको तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याबाबतचे वृत्त असे की, उपनगर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेटसमोर संशयित सरजित झांजोटे ऊर्फ दिंगिया याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्रेयसी आणि तिच्या मुलीवर चाकूने वार करून घटनास्थळावरून पळ काढला व स्वतःवरही चाकूने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडलेला आहे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हल्ल्यामध्ये अर्चना बाळासाहेब वाघमारे (34, रा. शिवाजीनगर, जेलरोड) या गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हल्लेखोर आणि जखमी महिला हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. दरम्यान त्यांच्यात कुठल्या तरी कारणावरून सतत भांडणे होत होती. त्याचे रूपांतर या जीवघेण्या हल्ल्यामध्ये झाले.

Post a Comment

0 Comments