हृदयद्रावक ! प्रेमासाठी घरातुन पळाले , मृत्यूने रस्त्यातच गाठले ... ट्रकच्या धडकेत प्रेमी युगुलाचा जागीच मृत्यू

 


लग्नासाठी घरातून पळून आलेल्या प्रेमी युगूलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुखःद घटना समोर आली आहे. औरंगाबादकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या धडकेत 20 वर्षीय तरूण आणि 14 वर्षीय तरूणीचा दुर्देवी मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पळून आलेल्या 20 वर्षीय तरूण आणि 14 वर्षीय तरूणीला औरंगाबादकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, गंभीर जखमी झालेले तरुण तरुणी दोघे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे आधारकार्ड पोलिसांना सापडले आहे. या सापडलेल्या आधार कार्डावरुन ही मुलगी दिल्लीची असल्याची माहिती समोर आली आहे.

असीम अब्बास आणि असिका कौसर अशी या तरुण तरुणीची नावे आहेत. हे दोघे या ठिकाणी का आले याबाबतही पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. फुलंब्री पोलीस या अपघाताचा तपस करत आहेत. या दुखद घटनेने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे

Post a Comment

0 Comments