तलवार घेवून रिल्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर , तरूणाला चांगलेच पडले महागात

 


सोशल मिडीयावर रिल्स बनवणे नाशिकमध्ये एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. हातात तलवार घेवून चित्रपटातील गितावर रिल्‍स तयार केले.

व्‍हीडीओ व्‍हायरल झाल्‍यानंतर पोलिसांपर्यंत पोहचला. यानंतर संबंधीत युवकाला पोलिसांनी ताब्‍यात घेतले. 

सोशल मीडियाचे भूत डोक्यावर चढलेल्या नाशिकमधील एका तरुणाने हातात तलवार घेऊन हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर रिल्स बनवले. हा व्हिडिओ नाशिकच्या गुन्हे शाखेच्या हाती लागला. मग काय सोशल मिडीयावर तलवार घेऊन रिल्स बनवणाऱ्या त्या तरुणाचे सोशल मीडियाचे डोक्यावर चढलेले भूत पोलिसांनी  उतरवले.

भारत नगर येथे राहणारा १९ वर्षीय संशयित फैजान नईम शेख याने हातात तलवार घेऊन त्याचा रिल्स बनवत हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी माहिती काढत भारतनगर इथे राहणाऱ्या फैजान शेखचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेत त्याकडून एक तलवार हस्तगत केली.

तलवारबाबत अधिक चौकशी केली असता त्याने ही तलवार भारतनगर येथेच राहणारा संशयित सचिन शरद इंगोले याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी सचिन इंगोले याला देखील ताब्यात घेत त्याकडून एक गुप्ती जप्त केली असल्याची माहिती नाशिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments