तरूणाने स्वतः चा जीव धोक्यात टाकून विशाल अजगराला वाचवलं

 


साप समोर दिसकी की भल्या भल्यांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. पण माणासांप्रमाणे सापालाही जीव असतो आणि त्यालाही त्याचं आयुष्य जगायचं असतं

एरव्ही रस्त्यावर किंवा गवतात साप फिरताना दिसला की, अनेक जण सापाला घाबरून धूम ठोकतात. पण काही माणसं साप संकटात सापडला असेल, तर त्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. अशीच एक थरारक घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. एक मुलगा पाण्यात अडकलेल्या विशाल अजगराला थरारक रेस्कू करून कसा वाचवतो, हे या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता.

एका नाल्यात पाण्याचा मोठा प्रवाह सुरु असताना मोठा अजगर साप पाण्यातून वाहत जात असतो. पण अजगर साप संकटात सापडलेला दिसताच एक तरुण धोका पत्करून नाल्याजवळ जातो आणि थेट हातातच अजगराला पकडतो. सापाला रेस्कू करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या स्टिकचा वापर त्या तरुणाने केला नसल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. हाताने अजगराला पाण्यातून सहज बाहेर काढताना हा तरुण व्हिडीओत दिसत आहे. अजगराला बाहेर काढल्यावर त्या तरुणासोबत असलेला दुसरा मुलगा त्या सापाची मान रस्सीने बांधताना व्हिडोओत पाहू शकता. हा थरारक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाच्या या धोकादायक कृत्याला काही नेटकऱ्यांनी वेडेपणाचं लक्षण असल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

@NarendraNeer007 नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अजगराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहिले असतील. पण हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. अजगर संकटात सापडल्यावर काही माणसं त्या सापाचा जीव वाचवतात. पण काही जण घरातच अजगरा सापासोबत खेळ करत असतात. अजगर सापाला घरात कोंडून त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणतात. असाच एक थरारक व्हिडीओ worldofsnakess या इन्स्टाग्रावर पेजवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये युजरने म्हटलं, “इतर प्राण्यांप्रमाणे या अजगरालाही एकटं राहायचंय. घरी अशा सापांसोबत जीवघेणा खेळ करण्याचा प्रयत्न करु नका. त्यांना फक्त एकटं राहून जंगलात फिरायचं आहे."

Post a Comment

0 Comments