स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची हत्या

 


लोणार तालुक्यातील हिरडवच्या स्टेट बँक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या 32 वर्षीय उत्कर्ष पाटील नामक व्यक्तीचा आज्ञातांनी गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याचे घटना उघडकीस आली.

घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भागातील रहिवासी असलेले उत्कर्ष पाटील हे हिरडव येथे स्‍टेट बँकेत  शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी मुंबई येथून ग्रामीण भागात परीक्षाविधी मॅनेजर म्हणून हिरडव शाखेत मॅनेजर म्हणून काम पाहत होते. केवळ तीनच महिन्यांपूर्वी या भागात नोकरीसाठी आलेल्या उत्कर्ष पाटील यांचा कुणी व कशासाठी खून केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मारेकऱ्यांनी ज्या चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला; तो चाकू देखील घटनास्थळी ठेवलेला होता. विशेष म्‍हणजे सदर खून हा रात्री थर्टी फर्स्टच्या पार्टीतून झाला की आणखी वेगळ्या कारणाने झाला. यात काही रहस्य दडलेले आहे हे आता तपासाअंती स्पष्ट होईल.

Post a Comment

0 Comments