विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


 याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने (वय 50) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप जगन्नाथ जाधव (वय 42), दोन महिला (सर्व रा. दत्तनगर, दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी तिच्या सासरी नांदत असताना तिच्या सासरच्या लोकांनी तिचा छळ केला. त्या छळाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने  31 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments