लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 


लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी आकाश संजय पडवळे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमासह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण २०१२ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वाडा खडकोना येथील अल्पवयीन मुलीला पडवळे याने लग्नाचे आमिष दाखवले होते. त्याने तिला स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर ऑक्टोबर २०२२ पासून १७ जानेवारी २०२३ पर्यंत अनेकदा अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. आपले बिंग फुटेल म्हणून त्याने तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता. पडवळे याने तिला औषधे दिल्याने तिला रक्तस्राव सुरू होऊन गर्भपात झाला. रक्तस्राव सुरूच राहिल्याने मुलीला तिच्या मामाने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मुलीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून पडवळे याला पोलिसांनी अटक केली.


Post a Comment

0 Comments