भर मंडपात नवरदेवाने पकडला मेहूनीचा हात .....

 


लग्नातील अनेक मजेशील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये लग्नात मजेशीर डान्स करणारे, काहीतरी विनोद करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये नवरदेव चक्क आपल्या मेहुणीचा हात पकडताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लग्न समारंभातील आहे. तर नवरदेव नवरी बसलेले असताना एक मुलगी नवरदेवाला काहीतरी खायला घालत आहे. नवरदेव तेवढ्यात या मुलीचा हात पकडतो आणि तिच्या हातातील पदार्थ खायचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात ती मुलगी खाली वाकून हातातील पदार्थ स्वत:च खाते.

दरम्यान, व्हिडिओमधील मुलगी ही त्याची मेहुणी असल्याचं व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी शेअर केला असून अनेकांनी त्यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्या अन्नामध्ये शुगर जास्त होती अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments