विदेशात कायमची निघून जात असल्याची बतावणी करून नाशिक येथून विवाहीत प्रियकराला बोलावून त्याला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे.
३४ वर्षांचा तक्रारदार नाशिकच्या नांदगाव, मनमाडचा रहिवाशी असून त्याच्या पत्नी, मुलगा आणि दोन भावांसोबत राहतो. तिथेच त्याचे स्वतः चे दुकान आहे. चार वर्षांपूर्वी त्याचे सांगलीच्या मिरजची रहिवाशी असलेल्या सोनाली नावाच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात वाद झाला आणि गेल्या वर्षी त्याने तिच्याशी असलेले संबंध तोडून टाकले. त्यानंतर सोनाली ही त्याला सतत फोनवरुन धमकी देत होती. त्याच्याविक्षरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करून आत्महत्या करण्याची धमकी देत तीस लाखांची खंडणीची मागणी करत होती. याबाबत पोलिसांनी मनमाड आणि येवला पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
नाशिक येथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गणेशने त्याला पुन्हा फोन करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. काही वेळाने सोनालीने त्याच्या पत्नीला फोनवर शिवीगाळ करुन दमदाटी केली होती. या प्रकारानंतर त्याने मनमाड पोलिसांत तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोनाली, गणेश व इतराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. १८ डिसेंबरला त्याने त्याला माहीम येथे बोलाविले होते. ती कायमची विदेशात जात असून त्यांची पुन्हा भेट होणार नाही असे तिने सांगितले होते. त्यामुळे १९ डिसेंबरला मुंबईत आला होता. माहीम येथे भेटल्यानंतर ते दोघेही खारच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथेच तिचा चुलत भाऊ गणेश व त्याचे तीन सहकारी आले होते. त्यांनी त्याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली. यावेळी त्याची चैन आणि अंगठी गहाळ झाली होती. हल्ल्यानंतर ते सर्वजण पळून गेले होते. नाशिकला जाण्यासाठी संध्याकाळी तो दादर रेल्वे स्थानकात आला होता. यावेळी त्याला सोनालीनेच त्याच्या चुलत भावासह इतरांना खार परिसरात बोलावून त्याला मारहाण केल्याचे समजले.
0 Comments