मंगेश बापू लोखंडे (वय 25, रा. पिंपळे गुरव) याला सांगवी पोलिसांनी अटक केले आहे. पिंपळे गुरव येथील पेट्रोल पंपाच्या समोरील मोकळ्या जागेत लोखंडे कोयता घेऊन आला असता सांगवी पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 29) रात्री दहा वाजता करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
रोहित आश्रुबा आव्हाड (वय 23, रा. निगडी) याला दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. आव्हाड हा अजंठानगर येथील गॅस पंपाच्या मागील बाजूला कोयता घेऊन आल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
0 Comments