जुन्या भांडणातून वहिनीवर कुऱ्हाडीने हल्ला

 


सातारा तालुक्यातील करंडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने वहिनीला मारहाण करीत कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये वहिनी जखमी झाली आहे. या प्रकरणी तिघा जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणी सुनीता नामदेव जाधव (रा. करंडी) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार ज्ञानदेव तुकाराम जाधव (वय ६), आनंद ज्ञानदेव जाधव आणि नीलेश ज्ञानदेव जाधव (सर्व रा. करंडी, ता. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, २९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करंडी येथे हा प्रकार घडला होता. तक्रारदार महिलेला दीर ज्ञानदेव जाधव यांनी जुन्या भांडणाच्या कारणातून व दोन्ही मुलांच्या सांगण्यावरून कुऱ्हाडीने मारहाण केली. यामध्ये सुनीता जाधव यांच्या डोक्याला व उजव्या हाताला मोठी जखम झाली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक दळवी हे तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments