दोन लाख रुपयांची लाच , पोलिस उपनिरिक्षकाला अटक


रोहित गणेश डोळस. (वय 31) असे अटक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या भावाला आरोपी न करणे, तसेच अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्याच्या बदल्यात डोळस यानी तक्रारदार व त्यांचे भावाकडे सुरुवातीला तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने डोळस यांना अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, संदीप वर्‍हाडे, पोलिस हवालदार मुकुंद अयाचीत, पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर आणि चालक एएसआय जाधव यांनी पडताळणी करून गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील  तपास एसीबी पुणेचे अधिकारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments