एकीकडे सगळीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी केली जातेय. तर दुसरीकडे वर्षाचा शेवटचा दिवसही अनेकांसाठी आयुष्याचा शेवटचा दिवस ठरतोय. वर्षाच्या शेवटी झालेल्या पाच विविध अपघातात 16 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
तर 68 जण जखमी झाले आहेत. औरंगाबाद आणि शिर्डीसाठी सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात बारामतीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीच्या सांगवी रस्त्यावर या सहलीच्या बसला गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
कोल्हापुरातील इचकरंजीतील सागर क्लासेसची आठवी ते दहावीच्या मुलींची सहल औरंगाबाद आणि शिर्डी येथे गेली होती. मात्र शिर्डी येथून इचलकरंजी येथे परतत असताना यशोदा ट्रॅव्हल्सच्या बसला बारामतीमधील पाहुणेवाडी गावच्या हद्दीत अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातात 24 मुली किरकोळ तर 3 मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या सहलीसाठी एकूण 48 मुली व 5 शिक्षक गेले होते. सध्या जखमींवर बारामतीतील महिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments