निवडणुकीत जिंकला पण जगणं मात्र हरला , २७ वर्षीय तरुणासोबत घडली भयंकर घटना

 


गावागावांतील राजकीय जनमताचा कौल मांडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात अनेकांनी बाजी मारली. विशेष बाब म्हणजे, निवडणुकीत तरुणांचा बोलबाला पाहायला मिळाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. पण दुसऱ्याच दिवशी या तरुणाचा मृत्यू झाला. 

या दुर्देवी घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. संग्राम सीताराम गुरव (वय २७) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. संग्राम हा करवीर तालुक्यातील सडोली दुमाला गावाचा रहिवाशी होता. संग्रामच्या अचानक निधनाने दुमाला  गावावर शोककळा पसरली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच संग्रामला ताप आला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये त्याला डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलं. मध्येच त्याला कावीळही झाला. त्यामुळं संग्रामची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्याच्यावर कोल्हापूरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

Post a Comment

0 Comments