मूल होत नसल्याने पतीने पत्नीचा तोडला हात आणि पाय

 


मुल होत नसल्याने पतीने पत्नीचा हात आणि पाय तोडलाची घटना कुरनूल जिल्ह्यातील चानुगोंडल, डॉन मंडल येथे मंगळवारी घडली. तर महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला पत्तीकोंडा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

अपत्य नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर अंदाधुंद हल्ला केल्याची घटना कुरनूल जिल्ह्यातील चानुगोंडल, डॉन मंडल येथे मंगळवारी घडली. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने पालकांनी बेशुद्ध झालेल्या महिलेला पत्तीकोंडा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

कुर्नूल जिल्ह्यातील पत्तीकोंडा मंडलातील चांदोली गावातील लालप्पा आणि आदिलक्ष्मी यांची मुलगी भवानी यांचा विवाह डॉन मंडलच्या चानुगोंडला गावातील राम याच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. लग्न झाल्यापासून आपल्या मुलीचा छळ होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पती आणि मेहुणे हे मुले होत नसल्यामुळे तिचा छळ करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मंगळवारी अंदाधुंद मारहाण करण्यासोबतच तिचा पाय आणि हातही तोडला. माहिती मिळताच ते तेथे गेले आणि आपल्या मुलीला ऑटोमध्ये घेऊन आले. पत्तीकोंडा सरकारी रुग्णालयात  तिच्यावर प्रथम उपचार केल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कर्नूलला नेण्यात आले. आपल्या मुलीवर हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर कारवाई करण्याची विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

 या आधीही औरंगाबाद येथे अशीच एक घटना घडली होती . पतीने दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्या खावून औरंगाबादेत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पत्नी गर्भवती राहिली, मात्र चौथे अपत्य नको म्हणून मजुरी करणाऱ्या पतीने पत्नीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. परंतू त्या किती प्रमाणात द्यायच्या याचे ज्ञान नसल्याने गोळ्यांचा ओव्हार डोस झाला आणि पत्नीला रक्तस्त्राव सुरु होऊन उपचारादरम्यान पत्नीचे निधन झाले. ही धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्यातील रेलगाव येथे घडली होती. या प्रकरणी महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला  होता.


Post a Comment

0 Comments