चाकण येथून अडीच लाखांचा गुटखा जप्त

 
विवेक हरिप्रकाश गुप्ता (वय 24, रा. चाकण, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अशोक गारगोटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे एका  टेम्पोमधून गुटखा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास चक्रेश्वर रोडवर कारवाई करून एमएच 14/ईएम 2177 हा टेम्पो अडवला.

टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दोन लाख 46 हजार 640 रुपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी गुटखा, मोबाईल फोन आणि टेम्पो असा पाच लाख सहा हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत

Post a Comment

0 Comments