मला घरी जायचे होते, पण मी वर्गातच कोंडले गेले. तेरा तास झाले, कुणी मला बघायलाही आले नाही. मी मुलगी म्हणून जन्मालाच का आले, असे शेवटचे शब्द तिने तिच्या वहीत लिहून ठेवले होते.
करीनाने वर्गात एकटे राहिल्याचा रागाच्या भरात व वर्ग बंद करताना कुणीही आतमध्ये साधे पाहिलेही का नाही, या विवंचनेत तिने गळफास घेतल्याचा अंदाज आहे. सुसाईड नोटमध्ये तिने मुलगी म्हणून कुटुंबाकडून होणार्या वर्तनाबद्दलही आक्षेप घेतलेला आहे. नोटमधील हस्ताक्षराची तज्ज्ञांमार्फतही चौकशी केली जात आहेत. हा प्रकार उघडकीला आला तेव्हा करिनाच्या कुटुंबीयांनी व गावकर्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना कोंडून मारहाण केली. करिनाच्या आईच्या तक्रारीवरून सुरक्षा रक्षकासह 7 शिक्षकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments