रस्त्यात अडवून वार करत तरूणाला लुटले

 


बलदेवसिंग दिलबागसिंग चौहान (वय 31, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौहान  हे गुरुवारी मध्यरात्री शितोळे नगर येथील स्पायर रोडने चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून चौघेजण आले. त्यांनी चौहान यांना अडवून त्यांच्या खिशातील पाकिटातून 1 हजार 530 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर धारदार हत्याराने चौहान यांच्या डोक्यात मागील बाजूला वार करून आरोपी पळून गेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments