घरगुती वादातून प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

 


घरगुती वादातून एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सूरत येथे उघडकीस आली आहे.

हत्या केल्यानंतर अपघात दर्शवण्यासाठी प्रियकरायच्या मदतीने महिने पतीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकला. मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे हे हत्याकांड उघडण्यास मदत झाली आहे. मृतदेह शहरातील डिंडोली परिसरातील प्रमुख पार्क ओवर ब्रिज खाली दिल्ली-मुंबई रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आला होता. विनोद बालदेव असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिचा प्रियकर आणि प्रियकराचा मित्र अशा तिघांना अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments