अपघातात टँकर चालक गंभीर जखमी

 


अपघाताची प्राथमिक माहिती देताना, महाजन म्हणाले की, आज मंगळवार 20 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास खंडाळा हद्दीत मुंबई लेनमध्ये टँकरने आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला आहे. यामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. तॊ टँकर केबिनमध्ये आत अडकला असल्याने पोलिसांनी त्याला बाहेर काढले. तॊ बेशुद्ध असल्याने त्याला खांद्यावर घेतले व ऍम्ब्युलन्समध्ये बसवून  पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. जखमी चालक बेशुद्ध असल्याने त्याचे नाव व पत्ता कळू शकला नाही.

Post a Comment

0 Comments