टेम्पो - एसटी बसचा भीषण अपघात : एकाचा मृत्यू, 30 प्रवासी जखमी

 


कोल्हापुरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणारा टेम्पो रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला. त्यावेळी समोरून येणाऱ्या बसचालकाने अपघात टाळण्यासाठी बसचे अचानक ब्रेक दाबले.

यामध्ये एसटी बस पूर्णत: अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या भीषण दुर्घटनेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले. 

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला आहे. तर एसटी बसचेही  मोठे नुकसान झाले आहे. गुरूवारी (२२ डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, उत्तूर-गडहिंग्लज रस्त्यावर हा अपघात झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गारगोटी आगाराची बस गडहिंग्लज कडून  गारगोटीकडे जात होती. त्यावेळी मालवाहू टेम्पो निपाणी कडे निघाला होता. दरम्यान, टेम्पो वेगात असताना रस्त्यावर अचानक पलटी झाला.

बाब समोरून येणाऱ्या बसचालकाच्या लक्षात आली. अपघात टाळण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला असून एसटी बसमधील ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments