अर्ध्या रात्री एकत्र आल्या 8 महीला , वृद्धाला रस्त्यावर घेरून चाकूने भोसकलं

 


सोशल मीडियावर संपर्क साधून अर्ध्या रात्री एकत्र येत 8 महिलांनी एका वृद्धाची हत्या केली आहे. कॅनडामध्ये एक विचित्र हल्ल्याची घटना समोर आली आहे.

ओंटारियो प्रांतात टोरंटोमध्ये भर रस्त्यात आठ मुलींच्या गटाने एका वृद्धाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेला टोळक्याचा हल्ला म्हटलं आहे. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे सर्व आरोपी मुली केवळ 13 ते 16 वयोगटातील आहेत. टोरंटो डाउनटाउनमध्ये रविवारी पहाटे झालेल्या चाकू हल्ल्यानंतर काही वेळातच या तरुणींना अटक करण्यात आली.

या प्रत्येक तरुणीवर सेकंड-डिग्री हत्येचा आरोप आहे, असं पोलिसांनी सांगितलं. या किशोरवयीन मुलींची त्यांच्या वयामुळे पोलिसांनी ओळख उघड केलेली नाही. दरम्यान, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटल्या होत्या आणि घटनेपूर्वी शहरातील विविध भागांतून येऊन एका ठिकाणी जमल्या होत्या. पण, मुलींनी त्या रात्री आणि त्या ठिकाणी भेटण्याचा निर्णय का घेतला होता, हे पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही.

टोरंटो पोलिसांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, त्यांच्याजवळून अनेक शस्त्रं जप्त करण्यात आली होती. टोरंटो पोलीस डिटेक्टिव्ह सार्जंट टेरी ब्राउन म्हणाले, "मी त्यांचं वर्णन या वेळी जमाव म्हणून करणार नाही, पण त्या रात्री जे काही घडलं त्याला आम्ही टोळक्याचा हल्ला म्हणू." ही हत्येची घटना थोडी विचित्र आहे. कारण त्या मुलींनी ज्याला मारलं, त्याला त्या आधीपासून ओळखत होत्या, या संदर्भातला कोणताही पुरावा नाही. ब्राऊन यांनी सांगितले की, पीडित व्यक्ती ही नुकतीच शेल्टर होममध्ये शिफ्ट झाली होती.

त्याच परिसरात त्याचं कुटुंबही वास्तव्यास आहे. तसंच पीडित वृद्ध निरश्रित नव्हता, कारण त्याच्या नातेवाईकांबद्दल माहिती मिळू शकलेली नसल्याने त्याची ओळख अद्याप पटवता आलेली नाही. तो वृद्ध रस्त्यात कुणाशी तरी बोलत होता, त्याच वेळी या मुली तिथे पोहोचल्या आणि त्याच्यावर हल्ला केला. एका स्थानिक शेल्टर होममध्ये राहणाऱ्या एका महिलेने सीबीसी न्यूजला सांगितलं की, ती एका शेल्टर होमच्या बाहेर त्या वृद्धाबरोबर सिगारेट ओढत होती, तेव्हा काही किशोरवयीन मुली तिथे आल्या आणि त्यांनी त्या माणसाच्या हातातून दारू घेण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाने नकार देत त्याला एकटं सोडण्यास सांगितलं. परंतु त्या सर्वांनी त्याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीने आपला जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या मुलींनी त्याच्या पोटात वार करून त्याची हत्या केली, असंही त्या महिलेने सांगितलं.


Post a Comment

0 Comments