वाढदिवसाच्या दिवशीच तरूणाला मृत्यूने कवटाळले

 


गुरुवार, दि. 22… 26 व्या वाढदिवसासाठी सकाळपासून तयारी सुरू होती. वृद्ध आई, लहान बहीण आणि पत्नीचीही धांदल उडाली होती. प्रणवही सकाळपासून घरात थांबला होता.

नातेवाईक, मित्रांना निरोप देत होता. सारेच उत्साहात असतानाच अनपेक्षित त्याची प्रकृती बिघडली. भोवळ आली… तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून थेट सीपीआरला… उपचारापूर्वीच प्रणवने मान टाकली…

वाढदिवसा दिवशीच प्रणवला मृत्यूने गाठल्याने कुटुंबीयांसह नातेवाईक, चंबूखडीतील दत्त कॉलनीतील ग्रामस्थांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पतीच्या मृत्यूनंतर मोलमजुरी करून प्रणवला लहानाचा मोठे केलेल्या मातेला, लहान भगिनीसह वर्षापूर्वी विवाहबद्ध झालेल्या श्रुती यांना धक्का बसला. त्यांच्या आक्रोशाने सारा परिसर हळहळला. प्रणव प्रकाश पाटील (वय 26) हा मूळचा चंद्रे ( ता. राधानगरी) येथील… लहानपणी वडिलांचा आधार गेला. प्रणव, मुलगी शिवानीला घेऊन आई रूपाली उत्तरेश्वर पेठ येथील भाऊ युवराज यादव यांच्याकडे आल्या. मामाकडे लहानाचा मोठा झालेल्या प्रणवचा वर्षापूर्वी विवाह झाला. केळी, भाजीपाला विक्री करून आई मुलांचा सांभाळ करीत होती. काही दिवसांपूर्वी चंबूखडीत घर घेऊन कुटुंब स्थायिक झाले.


Post a Comment

0 Comments