वाई येथे १७ वर्षीय मुलाचा धारदार हत्याराने वार करुन खून

 


वाई येथील सिद्धनाथवाडी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा धारदार हत्याराने वार करून रात्री खून करण्यात आला आहे. या घटनेने वाई तालुक्यात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीबाबत, अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या घटनेची माहिती सिद्धनाथवाडी ग्रामस्थांनी पोलिसांनी दिली. खून झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.

दरम्‍यान, घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक दाखल झाले आहे. याबात पुढील तपास पोलीस करत आहेत. खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव न्यास शिवाजी खरात असून त्याचे वय 17 आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत युवक पोलीस भरतीची तयारी करत होता. तसेच त्‍याचे कोणाशीही वैर नसल्याचेही नातेवाईकांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments