झाडाखाली चहा पित उभ्या राहीलेल्या व्यक्तीवर अचानक ओढावलं संकट

 


कोणावर कधी कोणत संकट येईल हे सांगता येत नाही असं आपण नेहमी म्हणत असतो. त्यामुळे लोकांनी सदैव सावध रहायला हवं. कारण, संकट काही सांगून येत नसतात. सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये निष्पाप लोकांना त्यांची काहीही चुक नसताना जीव गमवावे लागतात.

तर काही व्हिडीओ असे असतात ज्यामध्ये अत्यंत भयंकर संकटातून काही लोक सुखरुपरित्या वाचतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चहा पित असताना अचानक त्याच्यावर मोठं संकट ओढावतं मात्र सुदैवाने तो या संकटातून बचावतो.

@BornAKang या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात छत्री धरुन झाडाखाली चहा पित उभा राहिल्याचं दिसतं आहे. तो चहा पित असताना अचानक त्याच्या अंगावर झाडीची मोठी फांदी पडते, पण प्रसंगावधान राखत हा व्यक्ती चपळाईने त्या जागेवरुन बाजूला सरकतो. तो एवढ्या जोरात पळण्याचा प्रयत्न करतो की तो त्याच ठिकाणी पाय घसरुन पडतो.

मात्र, तो झाडाच्या फांदीखाली न सापडल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला आहे. कारण, झाडाच्या फांदीचा टोकदार भाग सरळ येऊन त्या व्यक्तीच्या शेजारी पडल्याचं व्हिडीओत दिसतं आहे. तो काही इंच जरी पुढे गेला असता तर निश्चितच त्याला मोठी दुखापत झाली असती कदाचित जीव देखील गमवावा लागला असता.

Post a Comment

0 Comments