रिक्षातून प्रवासी घेऊन निघालेल्या अनंत हरी पालकर (वय 47, रा. पालकरवाडी, ता. राधानगरी) या चालकाचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रिक्षातच मृत्यू झाला.
घटना बुधवारी व्हिनस कॉर्नर येथे घडली.
पालकर सोलर विक्री तसेच रिक्षाचालक होते. बुधवारी काही प्रवाशांना घेऊन दसरा चौकातून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जात असताना
व्हिनस कॉर्नर येथे त्यांच्या छातीत कळ आली. त्यांनी रिक्षा थांबवली; पण तिथेच ते तोल जाऊन पडले. अन्य एका रिक्षाचालकाने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पालकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे.
0 Comments