विठ्ठल भेटीची इच्छा अपूर्ण राहिली ; दर्शनासाठी निघालेल्या पती - पत्नीचा अपघातात जागीच मृत्यू

 


पंढरपूर : विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या पती-पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कार आणि बाईकमध्ये जोरदार धडक झाल्याने हाअपघात झाला. अपघातात विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या पती-पत्नाची जागीच मृत्यू झाला. 

विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना सातारा जिल्ह्यातील पती-पत्नीवर काळाने घाला घातला आहे. पंढरपूर - सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उपरी गावाजवळ आज दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कार आणि मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या भीषण अपघातामध्ये मोटारसायकलवरील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शेनवडी येथील प्रकाश दादा भुजबळ व लक्ष्मी प्रकाश भुजबळ या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचे दोन तुकडे झाले आहेत‌.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी‌ उपचासाठी भुजबळ दाम्पत्याला रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments