कामानिमित्ताने जालन्यात वास्तव्यास असलेल्या पतीने पत्नीचा खून केला.
किशोर आटोळे हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत असून गेल्या पाच महिन्यांपूर्वी ते शहरातील शंकरनगर भागात भाड्याची खोली घेवून राहत होते. किशोर हा सेक्युरिटी गार्डचे शहरात काम करत असल्याची ही माहिती सामोर आली. आज सकाळी त्याने पत्नीच्या डोक्यावर अवजड वस्तूने वार करून खून केल्याची धक्कादायक बाब घडली आहे.
पत्नीचा खुन केल्यानंतर तो फरार झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असून फरार पतीचा ही शोध सुरू केला. या घटनेने शहरात एकच खबळ उडाली आहे.
0 Comments