पतीचा अपघातात मृत्यू झाल्याचा विरह सहन न झाल्याने पत्नीनेही पतीच्या मृत्यूनंतर सहाच दिवसांत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बहाळ (ता. चाळीसगाव) येथे घडली.
बहाळ येथून लिंबू भरून मालवाहू वाहन १० डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास सुरतकडे जात होते. चाळीसगाव-धुळे रस्त्यावर दहिवद फाट्याजवळ ट्रकने या वाहनाला धडक दिली. या अपघातात ट्रकचालकासह संदीप रामभाऊ पाटील (वय ३२, रा. बहाळ रथाचे) यांचा अपघातात मृत्यू झाला होता. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
0 Comments