थरारक.... रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघांना भरधाव कारने उडवले

 


चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात रात्रीच्या सुमारास भयानक अपघात  झाला.

रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघांना भरधाव कारने उडविले आहे. यात एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर दुसरा अत्यवस्थ आहे. 

चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट ते सिंधी कॉलनी जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर हा अपघात झाला. रात्री साडेअकरा वाजता चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या बंडू ढोले व ओम ईटणकर यांना उडविले. यात बंडू ढोले याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चारचाकी चालक विनीत तावडे याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळ हा मोठा मार्ग असला तरी दुकान व घरांच्या अतिक्रमणाने यावर दिवसरात्र मोठी वाहतूक कोंडी होते.

जटपुरा गेट परिसरात रात्रीच्‍या सुमारास झालेल्‍या या अपघात सीसीटीव्हीमध्‍ये कैद झाला आहे. या सीसीटीव्‍ही फुटेजमध्ये भरधाव वेगातील अनियंत्रित चारचाकीने दोघांना उडविल्याचे कैद झाले आहे.

Post a Comment

0 Comments