अणुभट्टी साफ करताना दोन कामगारांचा मृत्यु

 


वाडा तालुक्यातील बिलोशी या गावच्या हद्दीत असलेल्या महिंद्रा रोझीन अँड टर्पेंटाईन या कारखान्यातील अणुभट्टीची साफसफाई करण्यासाठी टाकीमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

दरम्यान, कामगारांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांना नकार दिल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

सचिन बाळकृष्ण भोईर (रा. बिलोशी, वाडा) व सचिन यशवंत करले (रा. गोऱ्हे, वाडा) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुण कामगारांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिलोशी गावाच्या हद्दीत महिंद्रा रोझीन अँड टर्पेंटाईन हा रासायनिक कारखाना आहे. त्यात अणुभट्टी असून, ती साफ करण्यासाठी मंगळवारी रात्री एक कामगार उतरला होता. आतील रसायनाच्या वासामुळे तो गुदमरल्याने आरडाओरडा करू लागला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार भट्टीमध्ये उतरल्याने तोही गुदमरल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments