लग्नापूर्वीच गाठावे लागले पोलिस ठाणे ; नवरी निघाली ठग , दागिन्यांसह प्रसार

 


विवाह संकेतस्थळावरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात ,होताच, आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी लग्न जुळवून साखरपुड्याची तयारी केली.

बोहल्यावर चढण्यापूर्वीच होणारी नवरी साखरपुड्यासाठी घेतलेले दागिने आणि पैसे घेऊन पसार झाल्याने तरुणाला पोलिस वारी करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी खंडणी, तसेच फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

आयटी इंजिनीअर असलेला तरुण कांदिवली परिसरात कुटुंबीयांसोबत राहण्यास आहे. शादी डॉट.कॉम या बेबसाइटवरून त्याची सुप्रिया सिंगसोबत ओळख झाली. संवाद वाढला. त्यानंतर, सुप्रियाने कुटुंबीयांसोबत जवळीक वाढविली. लग्नही ठरले. साखरपुडा करण्याचा बनाव करत, तरुणी सोन्याचे दागिने, मोबाइल फोन व कपडे, पैसे असे एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज बळकावून नॉट रिचेबल झाली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तरुणाला धक्का बसला. अखेर १२ तारखेला चारकोप पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी सुप्रियासह चार जणांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे तरुण मानसिक धक्क्यात आहे. या प्रकरणी चारकोप पोलिस अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments