एका मिनिटात चोरल्या 7 कोटींच्या 5 लग्जरी कार

 


वाहनचोरीसंदर्भात सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. चोर अगदी शिताफीने वाहनं चोरतात. परंतु, इतर वाहनांच्या तुलनेत लक्झरी कार्सची चोरी करणं फारच अवघड काम मानलं जातं.

कारण अशा गाड्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बरीच फीचर्स दिलेली असतात. असं असतानाही इंग्लंडच्या एक्सेस काउंटी या भागात चोरट्यांनी चक्क साठ सेकंदांमध्ये सात कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पाच लक्झरी कार्स पळवल्या आहेत. चोरटे इतक्या वेगाने हालचाली करत आहेत, की सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्हीही चकित व्हाल. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कार चोरीचा प्रकार चित्रपटांमध्येही मोठ्या प्रमाणात दाखवला जातो. यात चोरटे अगदी हायटेक पद्धतीने चोरी करताना किंवा दरोडा टाकताना दाखवलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल झालेला कारचोरीचा हा व्हिडिओ पाहिला, तर तो कुठल्या चित्रपटातला सीन आहे की काय, अशी शंका निर्माण होऊ शकते. परंतु, ही खरी घटना असून चोरट्यांनी केवळ साठ सेकंदांमध्ये कोट्यवधी रुपये किमतीच्या कार पळवल्या आहेत.

चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये टिपली गेली. याचा व्हिडिओ पाहून पोलीसही चकित झाले आहेत. व्हिडिओत चार चोरटे कार घेऊन पळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांना आतापर्यंत याबाबतच्या तपासात काहीही यश मिळालेलं नाही.

Post a Comment

0 Comments