कर्नाटकच्या बागलकोटमध्ये एका 20 वर्षीय तरुणानं आपल्या वडिलांचे 32 तुकडे करून निघृण हत्या केल्याची बाब उजेडात आलीय. हत्येनंतर तरूणानं हे तुकडे शेतातील बोअरवेलमध्ये टाकले.
हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी JCB च्या मदतीनं बोअरवेल खोदून बॉडीपार्ट्स बाहेर काढले.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विठ्ठल कुलाल याला बेड्या ठोकल्या आहेत. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मंगळवारी विठ्ठलचे 54 वर्षीय वडील परशुराम कुलाल यांच्याशी उसाला पाणी देण्याच्या मुद्यावरून भांडण झालं होतं. या प्रकरणी परशुराम यांनी आपल्या मुलाला मारहाण केली होती. याचा राग मनात धरून आरोपी विठ्ठलनं आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
0 Comments