रुपयांच्या स्वेटरसाठी गावठी कट्ट्यातून गोळीबार

 


औरंगाबादमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून दहशतीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान मागच्या चार दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील मुख्य चौकात खून झाल्याची घटना घडली होती. दरम्यान ही घटना ताजी असताना असाच एक प्रकार समोर आला आहे. अहमदनगर महामार्गावर हिवाळी कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्याकडेला बसलेल्या व्यापाऱ्यांना धमकावत एकाने गावठी कट्ट्यातून त्याच्या दिशेने गोळीबार केला आहे. दरम्यान या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर महामार्गावर हिवाळी कपडे विक्री करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यापाऱ्यांना धमकावत एकाने गावठी कट्ट्यातून त्याच्या दिशेने गोळीबार केला. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री 11..35 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील अब्बास पेट्रोल पंपाजवळ घडली.


Post a Comment

0 Comments